हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे.हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केल्यानंतर हेमंत पाटील यांनी आंदोलकांना आपला राजीनामा लिहून त्याच्या हातात दिला.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा देणारे हेमंत पाटील पहिलेच नेते आहेत.
मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे.एकीकडे मराठा समजला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे जालना येथे उपोषण करत आहेत.तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सकल मराठा समाजाकडून नेत्यांना गावबंदी केली आहे.तसेच आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.त्यातच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे.हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.
हे ही वाचा:
भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
मरिन ड्राइव्हचे पारशी गेट जानेवारीला पुन्हा होणार स्थानापन्न
उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर खासदार पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या नावाने लिहिला आहे. यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली. मात्र मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यांनतर लागलीच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहितो असे सांगत त्यांनी राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.तसेच दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले.