23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणआधी हमासच्या नेत्याचे भाषण, दुसऱ्या दिवशी केरळमध्ये स्फोट

आधी हमासच्या नेत्याचे भाषण, दुसऱ्या दिवशी केरळमध्ये स्फोट

केरळमधील स्फोटानंतर सुरू झाली चर्चा

Google News Follow

Related

हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद मशाल याचे एक भाषण केरळमध्ये एका पॅलेस्टाइन समर्थकांच्या रॅलीत ऐकविण्यात आले. त्यानंतर केरळच्या कोचीत स्फोट झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

 

केरळमध्ये कोची जिल्ह्यात ख्रिश्चनांच्या एका प्रार्थना सभेत हे स्फोट झाले. एकामागोमाग एक असे चार स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून त्यात एक महिला दगावली आहे. या भागात ज्यूंची संख्या अधिक असल्यामुळे हा स्फोट घडविण्यात आला आहे का, याचाही तपास केला जायला हवा असे म्हटले जात आहे. सध्या या स्फोटांमागील कारणे कोणती हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा या स्फोटाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

 

हमासच्या नेत्याच्या भाषणानंतरच इस्रायलविरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागली आहे का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्यामुळे हे स्फोट घडल्याची चर्चा आहे. पॅलेस्टाइनच्या पाठिंब्यासाठी कोझीकोड येथे मोठा मोर्चाही निघाला होता. केरळमधील पॅलेस्टाइन समर्थकांच्या मेळाव्यात या मशाल नावाच्या नेत्याचे भाषण ऑनलाइन दाखविण्यात आले. त्यात त्याने पॅलेस्टाइनला समर्थन देण्याची भाषा केली.

हे ही वाचा:

उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल

अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार!

गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र

चक्क ‘हमास’च्या दहशतवाद्याने मलप्पुरमच्या नागरिकांशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासचा कमांडर खालेद मशाल याने भारतातील केरळच्या मलप्पुरम येथे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी भाजपने पिनराई विजयन यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन ३ आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचवेळी, हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल त्यांच्या स्थानांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. इकडे भारतातही इस्रायलच्या समर्थनात आणि विरोधात लोक उभे राहिले आहेत. नुकतेच केरळमधील मलप्पुरम येथून एक वादग्रस्त प्रकरण समोर आले असून त्यात हमासच्या दहशतवाद्याने केरळच्या लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संबोधित केले. त्याचवेळी भाजपने आता याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा