बँक फसवणूक प्रकरणी अशोका विद्यापीठाचे संस्थापक विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता यांच्या मुंबई आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.संबंधित प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) देशातील १७ ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत दाखल झालेल्या पॅराबोलिक ड्रग्स प्रकरणात दिल्ली, मुंबई, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले.या प्रकरणात पॅराबॉलिक ड्रग्स लिमिटेड आणि त्यांचे संचालक, प्रणव गुप्ता आणि विनीत गुप्ता यांनी १,६०० कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याची माहिती आहे.या तपासात विनीत गुप्ता आणि प्रणव गुप्ता हे अशोका विद्यापीठाचे संस्थापक असल्याचे समोर आले आहे.तसेच अजून छापेमारी सुरूच असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा..
पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना अटक
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन
भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष
वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह
‘प्रकरणाशी काही संबंध नाही’
ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर अशोका विद्यापीठाने प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, पॅराबॉलिक ड्रग्स प्रकरणाचा विद्यापीठाशी काहीही संबंध नाही.तसेच दिशाभूल करून हे प्रकरण विद्यापीठाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.