29 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरविशेषमाजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवले होते. ते मागील काही दिवसांपासून न्युमोनिया आजारावर उपचार घेत होते. बबनराव ढाकणे यांचे पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

हे ही वाचा.. 

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव

बबनराव ढाकणे यांची कारकीर्द

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. १९९४ साली महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा