अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी गाझामधील इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धाच्या अल जझीराच्या वृत्तांताचे प्रमाण कमी करण्याची सूचना कतार सरकारला नुकतीच केल्याचे समोर आले आहे. या वृत्तांकनामुळे या प्रदेशात तणाव वाढू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
अल जझिरा ही कतारमधील सरकारी मालकीची वृत्तवाहिनी आहे. ‘अल जझीराकडून हमास आणि इस्रायल यांच्या दरम्यानच्या युद्धाचा वृत्तांत प्रसिद्ध केला जातो. मात्र हा वृत्तांत इस्रायलविरोधी चिथावणीने भरलेला असल्याचा दावा करत या वृत्तांताचे प्रमाण कमी करावे, अशी सूचना ब्लिंकन यांनी कतार सरकारला केली आहे.
अमेरिकन ज्यू समुदायाच्या नेत्यांच्या एका गटाशी संवाद साधताना ब्लिंकेन यांनी हे वक्तव्य केले. गाझामधील युद्धाबाबत अल जझिराच्या वृत्तांकनामुळे या प्रदेशात तणाव वाढू शकतो, अशी भीती ब्लिंकेन यांनी व्यक्त केली.
१३ ऑक्टोबर रोजी दोहा येथे कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ब्लिंकेन यांनी हमाससोबत नेहमीप्रमाणे व्यवहार होऊ शकत नाहीत, यावर जोर दिला. ब्लिन्केनने अमेरिकन ज्यू नेत्यांना सांगितले की, त्यांच्या दोहा भेटीदरम्यान, त्यांनी कतार सरकारला हमासबद्दलची सार्वजनिक भूमिका बदलण्याची विनंती केली. या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून गाझामधील युद्धाचे अलजझिराचे वार्तांकन कमी केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
अल जझीरा मीडिया नेटवर्कला कतारी सरकारद्वारे वित्तपुरवठा होत असला तरी ते स्वतंत्रपणे चालते. मात्र आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून कतारच्या परराष्ट्र धोरणाची स्थिती प्रतिबिंबित होते. हमासशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांबाबतही अल जझिराला लक्ष करण्यात आले आहे.
इस्रायलच्या संपर्क मंत्री श्लोमा करही यांनी अल जझिरावर हमास समर्थक प्रचाराचा आणि इस्रायली सैनिकांना संकटात आणल्याचा आरोप केला होता. इस्रायली सुरक्षा अधिकारीदेखील कथितरीत्या अल जझीरा कार्यालय बंद करण्याचा विचार करत आहेत, हा प्रस्ताव सध्या कायदेशीर पुनरावलोकनाखाली आहे.
हे ही वाचा:
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
पोर्तुगीजांनी तोडली होती एक हजार मंदिरे; गोवा सरकारने बनवला मास्टर प्लॅन
कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला
ब्लिंकेन यांनी हमासबाबत कतारशी कठोर पवित्रा घेतला असला तरी बायडेन प्रशासनाला कतारसारख्या तेलसमृद्ध राष्ट्रापासून दूर जाणे परवडणारे नाही. शिवाय, हमासशी तडजोड करण्यासाठीही कतारचे मध्यस्थ म्हणून महत्त्व अधिक आहे. कतारच्या यशस्ली मध्यस्थीमुळेच अलीकडे दोन अमेरिकन ओलिसांची हमासच्या ताब्यातून सुटका झाली होती.