एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे जालना येथे उपोषण करत आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक भूमिका घेत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीची भूमिका राज्यातील अनेक गावकऱ्यांनी घेतली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या तर दुसरीकडे पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आजची मागणी नाही. त्या-त्या वेळी तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं पण मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना हे आरक्षण गमावलं. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची आहे, असं अजिबात नाही. आम्हाला प्रत्येकाला मराठा असल्याचा स्वाभिमान आहे आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी आहे.”
हे ही वाचा:
कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला
पोलीस कर्मचाऱ्याकडून ७ हजाराची लाच मागणारा सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबियांना शिंदे सरकारकडून मदत जाहीर
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर भाष्य करताना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, “मला वाटतं की, गुणरत्न सदावर्तेंसारख्या कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक बोलणं टाळलं पाहिजे. शेवटी त्या-त्या समाजाच्या भावना असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतायत. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही दिला नाही. त्यामुळे त्यांनी तसं बोलणं टाळलं पाहिजे नाहीतर समाज बांधवांच्या भावना तीव्र होतात आणि त्याचे पडसाद उमटतात, हे आपण पाहतोय.”
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर जरांगेचं भाष्य
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या प्रकरणी जरांगे म्हणाले, मला काहीच कल्पना नसून मराठा शांततेत आंदोलन करत आहेत. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही.