अमेरिकेत पुन्हा एकदा अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. एका बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल २२ ठार आणि ६० जण जखमी झाले आहेत. मैन येथील लेव्हिस्टन येथे हा गोळीबार झाला. या बंदुकधाऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत. या बंदुकधाऱ्याचे बंदुक हातात घेऊन नेम धरत असल्याचे छायाचित्र मिळाले असून पोलिस त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ही घटना अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री घडली.
येथील शेरीफच्या कार्यालयाने संशयिताची दोन छायाचित्रे फेसबुकवर जाहीर केली आहेत. त्यातील एका छायाचित्रामध्ये तो बंदुक हातात घेऊन नेम धरताना दिसत आहे. तसेच, या संशयिताची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामूहिक गोळीबाराच्या या घटनांमुळे मृतांची संख्या अधिक असल्याचे लेविस्टन येथील द सेंट्रल मैन मेडिकल सेंटरने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, जखमींवर उपचार करण्यासाठी अन्य रुग्णालयांशी समन्वय साधला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
गोळीबाराच्या या स्वतंत्र घटना बोलिंग ऍली, रेस्टॉरंट आणि व्हॉलमार्ट परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या बंदुकधाऱ्याने अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे वृत्त आल्याने पोलिसांनी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, जखमींना तत्काळ उपचार मिळावेत, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी रस्त्यावर गर्दी न करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.