देशाच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ असा वाद रंगला होता. भारतात पार पडलेल्या जी- २० शिखर परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेतही ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. भारत विरुद्ध इंडिया या वादाच्या वेळी G- 20 नेत्यांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवरील नेमप्लेटवर ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून वाद आणखी वाढला होता. या दरम्यान नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCERT) पॅनेलने मोठा निर्णय घेतला आहे.
नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCERT) पॅनेलने यापुढे छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा शब्द छापण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने स्वीकारला आहे. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव आता पॅनेलमधील सर्व सदस्यांनी एकमताने स्वीकारला आहे.
हे ही वाचा:
निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीवर मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट!
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
याव्यतिरिक्त, NCERT पॅनेलने पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू विजयांना म्हणजेच यशस्वी मोहिमांना अधिक महत्त्व देण्याची शिफारसही केली आहे. तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये ‘एन्शियंट हिस्ट्री’ऐवजी ‘क्लासिकल हिस्ट्री’ समाविष्ट करण्याची शिफारसही केली आहे. तसेच वैज्ञानिक प्रगती आणि ज्ञानाबाबत भारताला कमी लेखणाऱ्या ब्रिटिशांच्या इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, असंही सांगण्यात आले आहे.