गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल व हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या दरम्यान इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडियाच्या साइटवर हमासचा दहशतवादी आणि त्याचे वडील यांच्या दरम्यानच्या फोनवरील संभाषणाचा ऑडिओ जाहीर केला आहे. यात हमासचा दहशतवादी तरुण वडिलांना आपण कशी ज्यू नागरिकांची कत्तल केली, हे सांगत आहे. हे ऐकल्यानंतर त्याचे आईवडील खूष झाले आहेत.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा फोन या तरुणाने केल्याचे म्हटले जात आहे. तसेच, ज्या महिलेची या दहशतवाद्याने हत्या केली, तिच्याच फोनवरून त्याने पित्याला फोन केला. या महिलेचे शव इस्रायली सैन्याने दोन आठवड्यानंतर हस्तगत केले.
हे ही वाचा:
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार
निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीवर मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट!
ठाकरे हमास, लष्कर ए तैय्यबाशीही युती करतील!
या दोघांमध्ये खालील संभाषण झाले
महमूद – हॅलो डॅड, डॅड. मी मेफल्सिमच्या आत आहे. तुम्ही आता आपले व्हॉट्सअप सुरू करा आणि पहा, मी किती लोकांना मारलेय ते. तुमच्या मुलाने ज्यूंना ठार मारले.
पिता – अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. खुदा तुझे रक्षण करो.
महमूद – हे मेफल्सिमच्या आतील दृश्य आहे. मी एका ज्यू नागरिकाच्या फोनवरून बोलतो आहे. मी तिला आणि तिच्या पतीला ठार मारले आहे. मी स्वतःच्या हाताने १० ज्यू नागरिकांना ठार मारले आहे.
पिता – अल्लाहू अकबर
महमूद – तुमचा फोन उघडा आणि बघा, मी किती लोकांना ठार मारलेय ते. मी तुम्हाला व्हॉट्स अप कॉल करतो.
पिता – रडू लागतात. (कदाचित आनंदाने)
महमूद – मी १० जणांना ठार केले. त्यांचे रक्त माझ्या हातांना लागले आहे. मला अम्मीशी बोलायचे आहे.
आई- माझ्या मुला, अल्लाह तुझे रक्षण करो.
महमूद – मी एकट्यानेच १० जणांना ठार मारले.
पिता- अल्लाह, तुला सुरक्षित घरी पाठवू दे.
महमूद- तुमचा मुलगा हिरो आहे. सर्वांत पहिला मीच येथे आलो. अल्लाहच्या मदतीमुळे. अब्बू तुमची मान गर्वाने उंच करा.
(याच दरम्यान हमासचा हा दहशतवादी इतर सहकाऱ्यांना मारा, मारा असे सांगत आहे.)
महमूदचा भाऊ – महमूद, महमूद, गाझामध्ये परत ये. आता पुरे झाले. आता परत ये.
महमूद – परत? आता परत नाही येणार. आता केवळ विजय मिळेल किंवा हौतात्म्य. मला माझ्या आईने इस्लामसाठी जन्म दिला आहे. मी कसे परत येऊ?