‘बेस्ट गरबा’ म्हणून ११ वर्षीय मुलीला मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद दुःखात बुडाला. ज्या आयोजकांनी तिला गरब्याचे पारितोषिक दिले, त्याच आयोजकांसह अन्य सहा जणांनी तिच्या पतीची हत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटे गुजरातमधील पोरबंदर भागात घडली.
कृपाली ओदेदारा या ११ वर्षीय मुलीला नवरात्री उत्सवात दोन विभागांत पारितोषिक मिळाले. मात्र जेव्हा तिची आई तिला नेण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी आली, तेव्हा तिने तिची आई माली हिला तिला एकच पारितोषिक मिळाल्याचे सांगितले. याबाबत चौकशी करण्यासाठी माली या गरबा आयोजक राजू केसवाला यांच्याकडे गेल्या होत्या. मात्र केसवाला यांनी तिच्याशी उद्धट वर्तन केले. तसेच, आता कार्यक्रम संपला असल्यामुळे आपण आता काहीही करू शकत नसल्याचे सांगितले.
त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. या वादात केसवाला यांची पत्नी आणि आणखी एक आयोजक राजा कुच्चाडिया यांनी उडी घेतली. तसेच, तेथून लगेचच काढता पाय न घेतल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे माली या मध्यरात्री एक वाजता घरी परतल्या. त्या घराबाहेर त्यांचे पती सरमन यांच्यासोबत बसल्या असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चार बाइकवरून काही जण आले आणि त्यांनी सरमन यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यांनी जबरदस्तीने त्यांना बाइकवर बसवले आणि त्यांना गरब्याच्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यांच्या पत्नीने तातडीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस आणि ती लगेचच घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
सरमन यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी केसवाला, कुच्चाडिया आणि त्यांच्या पत्नी प्रतीक बोरानिया, रामदे बोखारिया आणि काही अज्ञातांविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.