हमासकडून कैद करण्यात आलेल्या इस्रायली वृद्ध महिला योचेव्हड लिफशिट्झ य़ांना सोमवारी रात्री हमासकडून सोडण्यात आले.त्यानंतर त्यांनी आपली घडलेली भयंकर कथा सांगितली.७ ऑक्टोबर रोजी माझे अपहरण करून गाझा येथे घेऊन जात असताना हमासच्या दहशतवाद्यांनी मला मारहाण केली. माझ्या दोन आठवड्यांच्या बंदिवासात ते माझ्याशी चांगले वागले. तसेच मी जखमी असल्याने तिथल्या डॉक्टरांनी माझावर उपचार देखील केल्याचे तिने सांगितले. पण अपहरण केले तेव्हा त्यांनी मला काठीने मारहाण केली, असे त्या म्हणाल्या.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा अनेकांना त्यांनी बंदी करून गाझा येथे ठेवण्यात आले होते, त्यामध्ये वृद्ध महिला योचेव्हड लिफशिट्झ (८५) हिचा समावेश होता.योचेव्हड लिफशिट्झसह आजून एका महिलेला हमासकडून सोडण्यात आले परंतु हमासच्या ताब्यात सुमारे २२० हुन अधिक बंधक कैद आहेत.
सुटका झाल्यानंतर योचेव्हड यांनी अपहरण कसे झाले याची माहिती दिली.त्या म्हणाल्या, मोटरसायकलवरून माझे अपहरण करण्यात आले आणि ते मला गाझा येथे घेऊन जात होते,” असे त्याने हिब्रू भाषेत सांगितले. लिफशिट्झच्या मुलीने याचे वर्णन करताना सांगितले की, मोटरसायकल वरून घेऊन जात होते तेव्हा योचेव्हड यांचे डोके मोटरसायकलच्या एका बाजूला होते आणि त्यांचे पाय खाली लटकत होते.दोन्ही बाजूने मोटारसायकली होत्या आणि एकजण मागून येत होता.
लिफशिट्झने पत्रकारांना सांगितले की, गाझामधील बोगद्यांमध्ये मी कैद असताना तेव्हा तिथे एक डॉक्टर मला भेटायला आला आणि त्याने माझ्या तब्बेतीची विचारपूस करत माझी काळजी घेतली.मला कधीही असे वाटले न्हवते की आपण अशा परिस्थिती मध्ये असू.आमच्याद्वारे बांधण्यात आलेल्या अडीच अब्ज डॉलरच्या कुंपणाला त्यांनी उडवून टाकले.त्यांनी आमच्या घरावर हल्ला केला.त्यानी वृद्धाला आणि एका तरुणाची हत्या करून त्यांचे अपहरण केले. लिफशिट्झ म्हणाली हे एक भयानक स्वप्न होते ज्याची कल्पना देखील करू शकत नाही.मला जेव्हा ते घेऊन जात होते तेव्हा मला एका मोटारसायकलस्वाराने लाकडी काठीने मारहाण केली.
हे ही वाचा:
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
तालिबानला खुपतोय अफगाणिस्तानचा विजय
त्यांनी माझ्या बरगड्या तोडल्या नाहीत परंतु मला तिकडे मोठी दुखापत झाली, त्यामुळे मला श्वास घेणे कठीण झाले.मी मोटरसायकलवर असताना त्यांनी माझे घड्याळ आणि दागिने चोरले. शेवटी आम्ही बोगद्यांमध्ये पोहचलो दोन ते तीन तास आम्ही बोगद्यांमधून प्रवास केला.बोगद्यातून पार करून एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो. आमचा एक २५ जणांचा समूह होता.त्यानंतर किबुट्झनुसार आम्हाला त्यांनी वेगळे केले.आमच्यामधील पाच जण किबुत्झ नीर ओझचे होते.
७ ऑक्टोबरच्या घटनांबाबत लिफशिट्झ म्हणाले की,इस्रायली सैन्य हमल्यासाठी तयार न्हवते.तिने आरोप केला की, तीन आठवड्यांपूर्वी मोठ्या संख्येने लोक घराच्या हद्दीपर्यंत पोहोचले होते.आयडीएफने ते गांभीर्याने घेतले नाही.त्यांनी आम्हाला आमच्या नशिबावर सोडले.त्या म्हणाल्या, हमास नरसंहारासाठी तयार आहे असे वाटत होते.त्याने यासाठी बराच काळ तयारी केली होती,” त्या म्हणाला.दक्षिण इस्रायलमधील गाझा सीमेजवळील किबुत्झ नीर ओझ येथी घरातून लिफशिट्झ आणि तिचा ८३ वर्षीय पती ओडेड यांचे अपहरण करण्यात आले.मात्र,लिफशिट्झचा पती ओडेड हा अजूनही हमासच्या कैदेत आहे.