मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८:३० वाजता त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-१९ केसेस लक्षात घेता, ते लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता अनेकांना वाटत होती. मात्र या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी केवळ लॉकडाऊनचे विदेशी आकडेच समोर ठेवले. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकरावर कठोर टीका केली आहे.
सातत्याने केवळ लॉकडाऊनची भाषा बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरसा दाखवला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन सोबत अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. युरोपमधल्या विविध देशांनी कोरोनाचा सामना करायला केलेल्या लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना कशाप्रकारचे आर्थिक सहाय्य दिले आहे, याची आठवण देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना फेसबूक पोस्टद्वारे करून दिली आहे.
हे ही वाचा:
उपाय सांगा, लस द्या, डॉक्टर द्या- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी दिलेली लसीकरणाची माहिती ‘अर्धवट’
फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन होताना १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली आहे. त्याबरोबरच हंगेरीने सुद्धा वर्क फ्रॉम होम देताना, युरोपियन युनियनमध्ये हक्काचा निधी मागून घेतला आहे. ग्रीसमध्ये देखील निर्बंध उठवताना लाखो उद्योगांना आणि बेरोजगारांना देखील मदत दिल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. अशा तऱ्हेने विविध युरोपियन देशांनी लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम सारखे विविध उपाय लागू करताना तिथल्या सरकारांनी काय काय मदत केली आहे, हे सविस्तर सांगितले आहे.
विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी वस्तुस्थिती दर्शवत शेवटी ‘आम्ही गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतील धावून जाण्याची.’ अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.