23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष‘हिरण्यकश्य हा चित्रपट माझ्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल’

‘हिरण्यकश्य हा चित्रपट माझ्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल’

अभिनेता राणा डुग्गुबाटी याची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

‘हिरण्यकश्यप हा चित्रपट माझ्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल,’ असा विश्वास अभिनेता राणा डुग्गुबाटी याने व्यक्त केला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेला राणा डुग्गुबाटी गेल्या काही वर्षांपासून हिरण्याकश्यप या कथेवर चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नात आहे.

हिरण्यकश्यप या चित्रपटावर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र चित्रपटाची कलात्मक गुणवत्ता चांगली व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे डुग्गुबाटी याने सांगितले. ‘ही पहिली अमर चित्र कथा किंवा पहिली सुस्पष्ट अमर चित्र कथा होती की जी संपूर्ण ब्रह्मांडमध्ये घडली होती. अशा पौराणिक कथांना पुन्हा सादर करणे गरजेचे आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या काळात या कथांना चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता आम्ही त्याला वेगळ्याप्रकारे आणि आणखी चांगल्या प्रकारे दाखवणार आहोत. आम्ही या चित्रपटाला शून्य ते ८० वर्षांच्या वयोगटाशी कसे जोडू शकतो, या दृष्टीने आमचा विचार सुरू आहे,’ असे तो म्हणाला.

हे ही वाचा:

नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

या चित्रपटासाठी अनेक जण मेहनत घेत असल्याचेही त्याने सांगितले. ‘या चित्रपटावर अनेकजण मेहनत घेत आहेत. आता माझ्याजवळ श्री त्रिविक्रम आहे. तो जेव्हा जेव्हा कोणता चित्रपट हातात घेतो, तेव्हा तेव्हा तो त्याच्यावर तुकड्यातुकड्यांत काम करतो. आमची एक टीम भागवत पुराणामधील सर्व कथांना एकत्र करते आहे,’ असेही तो म्हणाला. ‘हा एक असा चित्रपट असेल, जो दीर्घकाळासाठी माझे आयुष्य आणि चित्रपट निर्मितीची दिशाच बदलून टाकेल. या चित्रपटातून आम्हाला हेच लक्ष्य साध्य करायचे आहे,’ असा निर्धार त्याने व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा