23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणशिवतीर्थावर दसरा मेळावा नाही, शिमगा मेळावा

शिवतीर्थावर दसरा मेळावा नाही, शिमगा मेळावा

एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

Google News Follow

Related

‘शिवतीर्थावर जो दसरा मेळावा होणार आहे तो शिमगा मेळावा असेल.  शिमगा म्हणजे आपल्याला माहीतच आहे. सरकारच्या नावाने, मुख्यमंत्री, मोदींच्या नावाने ते शिमगा करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा दसऱ्याला न घेता तो शिमग्याला घ्यायला हवा होता,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. आझाद मैदानात शिवसेनेचा मेळावा होणार आहे तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कला होत आहे. आपल्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आझाद मैदानावर आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात तेच रडगाणे असेल बाकी काहीही नसेल. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही अशी त्यांची अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचारही नाही. उद्या मी याचा समाचार घेणार आहे.

 

या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून संभाजीनगरातून आमदार अब्दुल सत्तार यांनी २०० बसेस भरून माणसे आणण्याची तयारी केली आहे.

 

कडेकोट बंदोबस्त

 

दरम्यान या दोन्ही सभांसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.  आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या दसरा मेळाव्या साठी जवळपास १५ हजार मुंबई पोलिसांची फौज सह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या,  क्युआरटी आणि गृहरक्षक (होमगार्ड) बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा:

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया पवारांनीच रचला!

‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

त्याच बरोबर मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणसह दसरा मेळाव्या साठी येणाऱ्या वाहन चालकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान, मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गिकेमध्ये तात्पुरता बदल करून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत.

 

फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मागील वर्षांपासून वेगवेगळा दसरा मेळावा घेण्यात येत आहे. यंदा दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या उबाठा गटाकडून तर शिंदे गटांकडून आझाद मैदान या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहे.या दरम्यान मुंबईत लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनातून मुंबईत दाखल होणार असल्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.

 

दरम्यान या दोन्ही मेळाव्याच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी इतर बंदोबस्त याकरीता मुंबई पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (का. व सु.), मुंबई ह्यांचे देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई पोलीस दलाकडून ६ अपर पोलीस आयुक्त, १६ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी व १२४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच  महत्वाच्या ठिकाणी ३३  राज्य राखीव दलाच्या तुकड्या (SRPF) शीघ्र कृती दल( QRT) आणि गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्)तैनात करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा