महाराष्ट्राचा अक्षय गवते हा अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झाला मात्र सियाचेन येथे ड्युटीवर असताना त्याला अकाली मृत्यू झाला. त्यावरून राहुल गांधींनी सरकारवर टीका केली. अक्षयच्या नातेवाईकांना इतर जवानांप्रमाणे कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. हिंदी आणि इंग्रजीत राहुल गांधी यांनी हे ट्विट करत सरकारवर आरोप केले. राहुल गांधी त्यात लिहितात की, देशासाठी एका तरुणाने बलिदान दिले आहे. पण त्याला कोणतेही लाभ, लष्कराच्या कोणत्याही सुविधा आणि त्याच्या कुटुंबियांना पेन्शन नाही.
राहुल गांधी यांनी अग्निवीर अक्षयच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले पण त्यानंतर आपले राजकारणही त्यांनी त्यात शोधले. अग्निवीर योजनेतील जवानांना ग्रॅच्युइटी नाही, इतर सुविधाही नाहीत तसेच शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना पेन्शनही नाही. ही योजना भारतवासियांचा अपमान करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पण राहुल गांधी यांनी केलेले हे सगळे आरोप खोटे निघाले. अग्निपथ या योजनेनुसार अग्निवीरांना ज्या सुविधा मिळतात त्याचा जीआर आहे. नियमाप्रमाणे अशा जवानांच्या नातेवाईकांना ४८ लाख रुपये दिले जातात शिवाय, सानुग्रह अनुदान म्हणून ४४ लाखही मिळतात. त्याचप्रमाणे अग्निवीराने जो सेवा निधी म्हणून निधी जमा केला आहे तेवढाच सरकारही त्यात भर घालते. तसेच जवानाच्या मृत्यूनंतर त्याची उर्वरित रक्कमही नातेवाईकांना मिळते.
अक्षय गवतेच्या नातेवाईकांना याआधीच १३ लाख रुपये मिळणार आहेत. लष्करी दलाच्या युद्ध काळातील जखमींसाठी तयार केलेल्या निधीतून त्या जवानाला ८ लाखांपर्यंत मदत मिळते. अशी एकूण १.१३ कोटींची रक्कम अक्षयच्या कुटुंबियांना मिळालेली आहे.
हे ही वाचा:
स्वीडनमध्ये इराकी व्यक्तीने इस्रायलच्या ध्वजाचे घेतले चुंबन!
समलिंगींच्या बाबतीत ओढूनताणून कायदे करण्याची गरज काय?
पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!
सूर्यकुमार यादवला दुखापत तर ईशान किशनवर मधमाशीचा हल्ला!
राहुल गांधी यांनी यापूर्वीही अग्निवीर योजनेच्या नावाने बोंबा मारल्या आहेत. ही योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असल्याचा दावा ते करतात. त्याशिवाय, अग्निवीर योजनेतील या तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे तरुण समाजासाठी धोकादायक ठरू शकतात. पॉप्युलर फ्रंटच्या एका पदाधिकाऱ्याने मागे म्हटले आहे की, अग्निवीर योजनेतून चार वर्षांनी निवृत्त झालेले अधिकारी एकत्र येऊन गट तयार करून मुस्लिमांविरोधात या गटांचा उपयोग करतील.
सियाचिन में, अग्निवीर गवाते अक्षय लक्ष्मण की शहादत का समाचार बहुत दुखद है। उनके परिवार को मेरी गहरी संवेदनाएं।
एक युवा देश के लिए शहीद हो गया – सेवा के समय न ग्रेच्युटी न अन्य सैन्य सुविधाएं, और शहादत में परिवार को पेंशन तक नहीं।
अग्निवीर, भारत के वीरों के अपमान की योजना है! pic.twitter.com/8LcQpZR9f2
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 22, 2023
त्याआधी, अमृतपाल सिंग या अग्निवीर जवानाचा असाच मृत्यू झाला पण त्यावेळी या जवानाला सरकारी इतमामात संस्कार करण्यात आले नव्हते. त्यावरून राजकारण तापले होते. अमृतपालच्या पार्थिवावर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार कऱण्यात आले नाहीत, असा आरोप करण्यात आला. पण लष्कराने स्पष्ट केले की, अमृतपालचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाला होता, त्यामुळे त्याला रक्कम देता येत नाहीत.