देशाचे रक्षण करण्यासाठी लाखो सैनिक सीमेवर तैनात असतात.मागील वर्षापासून सरकारने अग्नीवर योजनेद्वारे अनेकांची भारतीय सैन्यात भरती केली.अग्नीवर योजनेद्वारे भरती झालेला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्यातील अक्षय गवते यास वीरमरण आले आहे.लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेला जवान अक्षय गवते यांना हौतात्म्य आले आहे.ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत.
जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे आहेत.सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती खालावली होती.त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.मात्र उपचारादरम्यान त्यांना २० ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राण जोत मालवली.
अक्षय गवते या जवानाचं पार्थिव आज सांयकाळी छत्रपती संभाजी नगर येथे आणण्यात येणार आहे.त्यानंतर २३ ऑक्टोबरला त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव सराईत सकाळी दाखल होणार आहे.
हे ही वाचा:
पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!
आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!
जनरल मनोज पांडे यांच्याकडून श्रद्धांजली
सियाचीनच्या दुर्गम उंचीवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण याना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि भारतीय लष्कराच्या सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
जवान अक्षय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.त्यांचे आई वडील शेती करतात.मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे.जवान अक्षय हे ३० डिसेंबर २०२२ ला अग्निवीर म्हणून सैन्यता दाखल झाले होते.