राज्यातील कंत्राटी भरतीचा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडीस नेत कंत्राटीचा जीआर रद्द केला.फडणवीस यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांची बोलतीच बंद केली.यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली.राज्यातील कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये त्यांच्या नोकऱ्या जाणार, अशा पद्धतीचा गैरसमज अकारण पसरवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एवढ्या मोठ्या लवकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरती करणार असल्याचे बातम्या अलीकडे येत होत्या.राज्यातील तरुण पिढी सरकारी नोकरीच्या आशेने कित्येक वर्ष प्रयत्न करत असतात.तरुण पिढीचे स्वप्न भंग करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे,असा आरोप विरोधकांनाकडून करण्यात येत होता.या कंत्राटी भरती संदर्भांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेतली.कंत्राटी भरतीचा निर्णय हा मागील काळातील म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ठाकरे सरकारनेच सुरुवात केल्याचे पुरावे सादर करत फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली.
हे ही वाचा:
गडकिल्ल्यांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे
ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान
‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!
‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधी कुणाच्या काळात कशा पद्धतीने नोकर भरती झाली याविषयी काल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली आहे. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एवढ्या मोठ्या लवकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.
पुण्यातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार पुण्यात आहेत.ते म्हणाले, सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्याने विकास कामांची पाहणी करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे.शिवाय माझ्या आणि अधिकाऱ्यांच्या कॅन्वॉयमुळे ट्रॅफिक थांबवलं जात नाही. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सकाळी ऑनफिल्ड कामाची पाहणी करत असल्याचं अजित पवार म्हणाले.