चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर होते. पालकमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा जिल्ह्याच्या दौऱ्याव आले होते.सोलापूरच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती.यावर आज चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मी कशासाठीही तयार असतो, माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असं राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत आपल्यावर दोन वेळा शाई फेकली, पण मी पुन्हा लगेच कामाला लागलो असंही ते म्हणाले.
दर आठवड्याला अमरावतीला यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटमध्ये मोठा निधी जातो पण अंबलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आले त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.सरकाराच्या निषेधार्थ नागरिकांकडून नेत्यांवर शाई फेकण्याचे प्रकार घडत असतात.अनेक नेत्यांना अथवा प्रतिष्ठित व्यक्तींना अशा आव्हानांना सामोरे जावे लागते.शाई फेक केल्यामुळे आपली प्रतिमा मालिन झाली असे कित्येकांना वाटते.मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देखील अशा आव्हानांना कित्येकदा सामोरे जावं लागलं आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर भीम आर्मीने शाईफेक केल्याची घटना घडली होती.तसेच महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाई फेक करण्यात आली होती.
हेही वाचा..
राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
हमास, रशिया लोकशाहीच्या विरोधात
सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाच्या निषेधार्त भीम आर्मीकडून शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काही छोटे दुकानं आज जिल्हाधिकारी परिसरात बंद केल्याचं मला समजलं. मी लगेच जिल्हाधिकारी यांना त्याबाबत कळवलं. काही होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी काळजी घेतली. पण मी त्यांना म्हटलं काही होत नाही आणि व्हायचं असेल तर चुकत नाही. मी कशासाठी ही तयार असतो. माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाही फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो आणि कमला लागतो, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.