बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या मुसक्या तब्बल ४३ वर्षांनी आवळल्या असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल ४३ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारग्लून येथील रहिवासी अब्दुल खालिक याच्याविरुद्ध १९९८ मध्ये मेंढर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील धारग्लून गावात पोलिसांनी एका व्यक्तीला त्याच्या आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध १९७९ मध्ये दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
अब्दुल खालिक (वय- ६३) याच्या विरुद्ध पुंछ सत्र न्यायालयाने १९ सप्टेंबर १९९२ रोजी अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली तेव्हा खालिक आखाती देशात पळून गेला होता जिथे तो मजूर म्हणून काम करत होता. त्यानंतर, अनेक वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता, तर त्याचा साथीदार जामिनावर सुटला. पुढे खालिकने त्याच्या साथीदाराची भेट घेण्यास सुरुवात केली. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी त्याला अटक केला, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा..
कुत्ता गोळीची नशा कोण करतं ते ठाऊक आहे संजय राऊत!
राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
हमास, रशिया लोकशाहीच्या विरोधात
सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील
“जिल्हा पोलिसांनी फरार लोकांना, विशेषतः खून, बलात्कार आणि दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करण्याची मोहीम सुरू केली आहे,” अशी माहिती पूंछचे एसएसपी विनय शर्मा यांनी दिली. यावर्षी २९ मे रोजी जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विनय शर्मा म्हणाले की, त्यांनी सर्व आरोपींची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या असून या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. या अंतर्गत पोलिसांनी पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ५८ लोकांना अटक केली आहे.