पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज गाझियाबादमध्ये देशातील पहिली रॅपिड रेल्वे ‘नमो भारत’ला हिरवा झेंडा दाखवला आहे.ही रेल्वे अधिक सुरक्षित आणि हायटेक करण्यात आली आहे. रॅपिडेक्स रेलमध्ये वापरलेले तंत्रज्ञान अगदी वेगळे आहे आणि ट्रेनमध्ये दिलेली हायटेक वैशिष्ट्ये ही वेगळी आहेत. रिपोर्ट्सनुसार, रॅपिड एक्स ट्रेन कोणत्याही अपघातापूर्वी ड्रायव्हरला अलर्ट करेल आणि या ट्रेनमध्ये बसवलेले सेन्सर्स ऑटोमॅटिक असणार आहेत.
दिल्ली आणि मेरठ दरम्यान ८२ किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर बनवला जातात आहे.या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबाबाद ते दुहाई दरम्यान १७ किलोमीटरचं अंतर कापेल.२१ ऑक्टोबर पासून लोकांना या ट्रेन मधून प्रवास करता येणार आहे.नमो भारत ट्रेन २०२५ पर्यंत दिल्लीतील सराय काले खान आणि मेरठमधील मादीपूरम या स्थानकादरम्यान धावेल.
हे ही वाचा:
कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!
ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा
ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक
बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!
PM @narendramodi ji launched the 'Namo Bharat' Rapid Rail Transit System, marking a significant moment in India's transportation history.
This remarkable development represents India's fastest mode of transport.
An iconic moment symbolizing progress and innovation in the… pic.twitter.com/IJCvQFR1ud
— Amit Rakksshit 🇮🇳 (@amitrakshitbjp) October 20, 2023
रॅपिड रेल्वेची वैशिष्ट्ये
ही ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित आहे पण त्याचबरोबर या ट्रेनच्या प्रत्येक बोगीमध्ये आपत्कालीन बटण देखील देण्यात आले आहे. कोणीही हे बटण दाबताच सेन्सर्स कार्यान्वित होतील. चुकून कोणी बटन दाबले तर ट्रेन थांबणार नाही पण ड्रायव्हरला खरी अडचण आहे असे वाटले तर ट्रेन थांबवली जाईल.दिल्ली मेट्रोच्या विमानतळ मार्गावर, मेट्रोचा वेग १२० किमी आहे, तर रॅपिड एक्स ट्रेनचा वेग १६० किमी पर्यंत जातो. रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण मार्गावर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे, एवढेच नाही तर ट्रेनमध्ये ऑटो पॅनल आणि वॉर्निंग सिस्टिमही बसवण्यात आल्या आहेत.तसेच ट्रेन मध्ये मोफत वाय-फाय ,मोबाईल चार्जिंग पॉईंट्स,टोकन,क्यूआर कोड अशा विविध सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.