पश्तून भाषा बोलणारे योगराज साहनी त्यांच्या पठाण या वंशाबद्दल बोलताना हिंदू हे विशेषण आवर्जून लावतात. ‘आम्ही पठाण आहोत. पण लक्षात ठेवा, आम्ही हिंदू पठाण आहोत,’ असे ते आधीच जाहीर करतात. या वर्षीही ते दरवर्षीप्रमाणे रावण दहनाची प्रथा पाळणार पाहेत. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील कोहाट जिल्ह्यातील थाल आणि बन्नू भागात मुळे असणारे योगराज साहनी आणि त्यांचे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक यंदा ७२वा रावणदहनाचा कार्यक्रम नागपुरात मोठ्या उत्साहात करतील.
८४ वर्षीय योगराज भूतकाळात रमतात. तेव्हा ते अवघे आठ वर्षांचे होते. आमचे घर अफगाणिस्तान सीमेजवळ होते. तेथून काही अंतरावरच मिठाचे ढिगारे असायचे. त्यांच्याजवळ अविभाजित भारताचा नकाशा आहे. त्यांचे नातेवाईक वस्तूंच्या व्यापारात होते, असे त्यांचा पुतण्या मिलान सांगतो.
हिंदू पठाण हे १९४७च्या सुमारास मध्य भारतात स्थलांतरित झाले. नागराज हे नागपूरच्या काबडी चौकात राहतात. त्यांच्या घरात अफगाणी वेश परिधान केलेल्या त्यांच्या आजोबांचे-मणिराम यांचे छायाचित्र आहे. त्यांच्या हातात बंदुक आहे, तसेच त्यांच्या शेजारीच बंदुक घेतलेल्या जयराम यांचेही छायाचित्र आहे. हे कुटुंब फाळणीच्या आसपास मध्य भारतात स्थलांतरित झाले. येथे येताना त्यांनी त्यांचा सनातन धर्म तर सोबत आणलाच, शिवाय त्यांनी त्यांच्या मूळ गावाचे गुणधर्मही सोबत आणले. या छायाचित्रात दिसणाऱ्या तीन जणांचा अफगाणी टोळ्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या अफगाणी टोळीने बन्नू गावात हल्ला केला होता. मात्र त्यांना रोखताना, त्यांच्या गावांचे रक्षण करताना हे तिघे शहीद झाले.
‘पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात बंदुकीची एक वेगळीच संस्कृती आहे. तेथील प्रत्येक हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीय बंदुक बाळगतात,’ असे योगराज सांगतात. ‘पुरुषांकडे बंदूक नसेल तर त्यांना लग्नासाठी वधूच मिळणार नाही,’ असेही ते सांगतात. मात्र इतक्या वर्षांत काय बदलले नसेल तर हिंदू पठाणांमध्ये दसरा साजरा करण्यासाठी लागणारा अतोनात उत्साह. ‘आम्ही उत्साहाने राम लीला बघतो आणि रावणदहनही मोठ्या आनंदाने करतो,’ असे ते सांगतात.
‘हिंदू पठाण हा अतिशय छोटा अल्पसंख्य गट होता. मात्र आम्ही मुस्लिमांना आमच्या बांधवांप्रमाणे वागवायचो. येथील मंदिर आणि मशिदीमधील भिंत एकच आहे. येथील अझान आणि मंदिरामधील घंटेचा निनाद एकमेकांत सहजच मिसळून जातो,’ असे ते सांगतात.
हे ही वाचा:
१ नोव्हेंबरपासून राज्यातील उसाच्या गळीत हंगामाला सुरुवात!
बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!
ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; पोहचताच व्यक्त केल्या भावना
इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट
योगराज यांचे कुटुंब एप्रिल १९४७मध्ये जेव्हा प्रथम भारतात आले, तेव्हा त्यांनी काही वर्षे हरिद्वारमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर ते फरिदाबाद येथे गेले. अखेर त्यांनी नागपूरमध्ये कायमस्वरूपी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. याच हिंदू पठाणांनी भारतात सनातन धर्म युवक संस्थेची स्थापना केली. त्यानंतर या संस्थेची शाखा नागपूरमध्ये सुरू झाली, तेव्हा योगराज त्याचे प्रमुख होते. सध्या नागपूरमध्ये कोहात येथील सुमारे २०० हिंदू पठाण कुटुंब राहतात.
गेल्या वर्षी प्रमाणेच साहनीज, सूमरोज, तलवार आणि सेहगल हे कुटुंबीय पुढील आठवड्यात होणाऱ्या रावण दहन सोहळ्याची वाट पाहात आहेत. नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्क मैदानात होणारा हा कार्यकर्म हजारो लोकांचे आकर्षणाचे केंद्र असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना नेहमीच या सोहळ्याचे निमंत्रण असते.