31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियाशरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!

शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे!

पवारांच्या इस्रायलविरोधी भूमिकेनंतर बिस्वसर्मांनी डिवचले, भाजपाकडूनही समाचार

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एकीकडे भारताने इस्रायलला पाठिंबा दिलेला असताना शरद पवार यांनी मात्र पॅलेस्टाइनला केवळ पाठिंबाच दिलेला नाही तर भारताने इस्रायलला दिलेला पाठिंबा दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले तसेच पॅलेस्टाइनसोबत खंबीरपणे उभे राहायला हवे, असा सल्लाही त्यांनी पंतप्रधानांना दिला होता. त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांना पवारांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना गाझाला पाठवतील. तिथे पॅलेस्टाइन स्थित दहशतवादी संघटना हमासतर्फे त्या लढू शकतील.

 

शरद पवारांनी म्हटले होते की, ही संपूर्ण जागा पॅलेस्टाइनची आहे. इस्रायलने तिथे अतिक्रमण केले आहे. तेथील जमीन, घरे ही पॅलेस्टाइनची होती ती इस्रायलने बळकावली आहेत. इस्रायल हा परका आहेती जमीन मुळात पॅलेस्टाइनची आहे.

 

शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून सडकून टीका करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पवारांचे हे वक्तव्य हतबुद्ध करणारे आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, बाटला हाऊसवर झालेल्या हल्ल्यानंतर अश्रु ढाळणाऱ्या त्याच सरकारचे शरद पवार हे भाग होते. भारतीय भूमीवर हल्ला होत असताना हे सरकार झोपले होते.

 

हे ही वाचा:

पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी

निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!

“मी पळालो नाही, पळवण्यात आलं” ललित पाटीलचा आरोप

पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पवारांचे हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, प्राप्त परिस्थितीत आपण सगळ्यांनी दहशतवादाच्या विरोधात उभे राहायला हवे.

 

 

७ ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर अचानक आक्रमण केले. ५ हजार रॉकेट्स डागण्यात आली आणि जमीन, जल, आकाश अशा तिन्ही ठिकाणांहून आक्रमण करण्यात आले. त्यात हजारो नागरिक मारले गेले आहेत. इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवून त्यांचे अपहरणही करण्यात आले आहे तसेच त्यांना गोळ्या घालून, गळे चिरून मारण्यातही आले आहे. त्यानंतर भारताने ८ ऑक्टोबरला इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलसोबत असल्याचे सांगत दहशतवादाचा कठोर शब्दांत निषेध नोंदविला. इस्रायलवरील हल्ल्यामुळे आम्हाला धक्का बसला असून आम्ही इस्रायलच्या निरपराध नागरिकांसाठी प्रार्थना करत आहोत. अशा कठीण परिस्थितीत आम्ही इस्रायलसोबत आहोत. पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांनी सार्वभौम, स्वतंत्र राहात एकमेकांचा आदर राखावा अशी भूमिकाही भारताने घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा