फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना ललित याने गौप्यस्फोट केला आहे. “मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं,” असा खळबळजनक आरोप त्याने केला. ‘एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये हे कैद झालं असून याबाबत वृत्त देण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस ललित पाटील याचा शोध घेत होते. अखेर ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. दरम्यान, न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होतं. यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना ललित पाटील याने आरोप केला की, “मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन” असं त्याने म्हटलं.
चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलिसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या ललित याला अटक करण्यात आली. यानंतर ललित पाटील याला बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सादर केले जाणार आहे.
हे ही वाचा:
बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या
जरांगे पाटलांना समज कोण देणार?
प्रकरण काय आहे?
पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.