31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाड्रीम ११ वर दीड कोटी जिंकलेले पीएसआय झेंडे निलंबित

ड्रीम ११ वर दीड कोटी जिंकलेले पीएसआय झेंडे निलंबित

वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका

Google News Follow

Related

पिंपरी चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी काही दिवसांपूर्वी ड्रीम ११ या ऑनलाईन खेळात करोडो रुपये जिंकल्याचे समोर आले होते. मात्र, या करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यावेळी पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ वर आपली टीम लावली आणि त्यातून ते करोडो रुपये जिंकले. दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या. पुढे पोलिसांनीच त्यांची चौकशी केली आणि त्यांचे निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुढे विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.

तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. पण इथं तर स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे. त्यामुळं पोलीसांनी पीएसआय झेंडेना दोषी ठरवले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत सैराट चित्रपटाची पुरावृत्ती; नव जोडप्याची हत्या, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार

प्रकरण काय?

सोमनाथ झेंडे यांना क्रिकेटची आहे. शिवाय गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम ११ या ऑनलाइन गेमचे त्यांना वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा