भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’ने नुकतीच चांद्रयान- ३, सूर्यमोहिम यशस्वी करून दाखविली. या यशानंतर ‘गगनयान’ हे मोहीम असून हे यान प्रक्षेपणाठी सज्ज झाले आहे. शनिवार, २१ ऑक्टोबरला गगनयानाचे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेसंदर्भात मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील भारतीय अंतराळ मोहिमांचे वेळापत्रक जाहीर केले. आगामी वर्षात इस्रोच्या सहाय्याने भारत २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणार असून, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार असल्याचे या महत्त्वाच्या बैठकीत सांगितले.
भारताची आगामी गगनयान मोहिमेच्या प्रगतीचे मूल्यांकन आणि भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याची रूपरेषा तयार करण्यासाठी आज पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. पीएमओ कार्यालयात झालेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी भविष्यातील महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमांची घोषणा केली.
#WATCH | PM Modi chairs high-level meeting to assess the progress of Gaganyaan Mission and to outline the future of India’s space exploration endeavours pic.twitter.com/kVwhBdLiI0
— ANI (@ANI) October 17, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चांद्रयान- ३, आदित्य- L1 सूर्यमोहिमेच्या यशानंतर गगनयान संदर्भात चर्चा झाली. तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून भारत भविष्यात शुक्र आणि मंगळावरील मोहिमा हाती घेणार आहे. तसेच २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारले जाणार असून, २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवणार असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितले.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोबरची नवी मुदत
अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी
‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’
महादेव बेटिंग ऍप प्रकरणी सौरभ चंद्राकरच्या निकटवर्तीयाला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भविष्याविषयीच्या बैठकीत भारतीय शास्त्रज्ञांना व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडर यांचा समावेश असलेल्या आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे सुचविले. तसेच भारताने आता नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करावीत असे निर्देश देखील या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.