इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलचा दौरा करणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली. ‘इस्रायल, मध्य पूर्वेकडील देश आणि जगभरासाठी हा नाजूक क्षण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी इस्रायलचा दौरा करतील,’ असे ब्लिंकन यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी तेल अविव येथे येऊन इस्रायलला अमेरिकेकडून असणाऱ्या पाठिंब्याला दुजोरा देतील. तसेच, इस्रायलला हमास आणि अन्य दहशतवादी संघटनांपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आणि हल्ल्यांना रोखण्याचा संपूर्ण अधिकार आहे, या वक्तव्याचा पुनरुच्चार करतील. अन्य देश आणि विविध संघटनांना गाझा पट्टीतील नागरिकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी सर्वोतपरी बळ देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यावर अमेरिका आणि इस्रायलचे एकमत झाल्याचेही सांगण्यात आले. तसेच, या युद्धाचा गैरफायदा घेऊन इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांनाही राष्ट्राध्यक्ष बायडेन इशारा देतील, असे मानले जात आहे.
हे ही वाचा:
ठाकरेंना दणका; शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’
निठारी हत्याकांडातील दोषी कोली, पंधेर निर्दोष, मृत्युदंडाची शिक्षा रद्द
पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप
ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी अमेरिका त्यांच्या अन्य सहकारी देशांशी चर्चा करेल, असे आश्वासनही बायडेन देतील, असे बोलले जात आहे. इस्रायली आणि पॅलिस्टिनी दहशतवाद्यांमधील युद्धाचा मंगळवारी ११वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत चार हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुमारे १४०० इस्रायली नागरिक आणि दोन हजार ७५०पॅलिस्टिनी नागरिकांचा समावेश आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे २०० इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिका अन्य देशांसह प्रयत्न करत आहे.