आशिया क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४ x ४०० मीटर शर्यतीत भारताला रौप्य पदक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारी ऐश्वर्या मिश्राचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आज उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर ऐश्वर्याने भेट घेतली.फडणवीस यांनी तिचे स्वागत करत तिचे अभिनंदन केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याची माहिती दिली.फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ४ × ४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावून, भारताचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविणार्या ऐश्वर्या कैलाश मिश्रा या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली लेकीची आज भेट घेतली.
भेटीदरम्यान तिच्या प्रवास आणि कर्तृत्वाविषयी जाणून घेतले. मुंबईतील एका फळविक्रेत्याच्या मुलीने आपल्या दमदार कामगिरीने देशासाठी रौप्य पदक पटकावणे, ही सर्वांसाठी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे.
ऐश्वर्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
हे ही वाचा:
बेपत्ता इस्रायलींच्या नातेवाईकांनी नेतान्याहूंना सांगितले हृदयद्रावक प्रसंग
सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण
उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत
क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका
माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी खेळाडू ऐश्वर्या मिश्रा हिची भेट घेत तिचे अभिनंदन केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऐश्वर्याची भेट घडवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.त्यानंतर ऐश्वर्या मिश्रा हिने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर भेट घेतली.
घर आणि सरकारी नोकरी देण्याचे फडणवीसांचे आश्वासन
ऐश्वर्या मिश्रा ही मुंबईतील झोपडपट्टी मध्ये राहत वास्तव्यास आहे.तिचे वडील फळविक्रेता आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ऐश्वर्याने राहण्यासाठी घर आणि सरकारी नोकरी देण्याची विनंती केली.यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तो निर्णय घेणाचे आश्वासन दिले.तसेच ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने ऐश्वर्याला जोरदार तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.