25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषसचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण

सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण

Google News Follow

Related

विश्वचषक २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केल्यामुळे खळबळ माजली आहे. अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे सोशल मीडियावरही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही या विजयाबद्दल अफगाणिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या पराभवाचे कारणही सांगितले. इंग्लंडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंसमोर सपशेल लोटांगण घातले, हेच त्यांच्या पराभवाचे कारण असल्याचे सचिन तेंडुलकर म्हणतो.

गतविजेत्या इंग्लंडचा या विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे. तर, अफगाणिस्तानचा हा संपूर्ण विश्वचषक इतिहासातील हा केवळ दुसराच विजय आहे. याआधी त्यांनी सन २०१५मध्ये स्कॉटलंडला पराभूत केले होते. सचिन तेंडुलकरने या विजयाबाबत अफगाणिस्तानच्या संघाचे अभिष्टचिंतन केले तर, आजचा दिवस इंग्लंडसाठी वाईट ठरल्याचे नमूद केले. यासाठी तेंडुलकरने अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे कौतुक केले. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमान आणि राशिद खान याने प्रत्येकी तीन तर, मोहम्मद नबी याने दोन विकेट घेतल्या.

‘रहमानुल्लाह गुरबाज याची दमदार खेळी, अफगाणिस्तानची अष्टपैलू कामगिरी आणि इंग्लंडसाठी वाईट दिवस. चांगल्या गुणवत्तेच्या फिरकीपटूंचे हात बघूनच चेंडू कसा जाईल, हे तुम्हाला ताडावे लागते. यातच इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडचे फलंदाज त्यांना खेळपट्टीवरून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, मला वाटते हेच त्यांच्या अपयशाचे कारण ठरले असावे. मैदानावरील त्यांची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. अफगाणिस्ताने सर्वोत्कृष्ट खेळ केला,’ अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने ‘एक्स’वर या सामन्याचे विश्लेषण केले.

हे ही वाचा:

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोइत्रा यांनी घेतली लाच?

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

अफगाणिस्तानने नाणेफेक हरल्यानंतर त्यांना पहिल्यांदा फलंदाजीला उतरावे लागले. त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाज (८०) आणि इकराम अलीखिल (५८) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने २८४ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून आदिल रशिदने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा