हमास या दहशतवाद्यांच्या गटाने इस्रायलवर केलेल्या नृशंस हल्ल्याच्या खाणाखुणा जिकडेतिकडे दिसत असताना आता हा हल्ला होतेवेळी करण्यात आलेले चित्रिकरण स्वतः हमासनेच जाहीर केले आहे.
इस्रायलमध्ये एका संगीत महोत्सवात आलेल्या नागरिकांवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. तेव्हा तेथील शौचालयांवरही बंदुकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या महोत्सवात सुमारे २६० जण हमासच्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले.
गाझा पट्टीजवळील वाळवंटी भागात या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संगीतप्रेमींनी हजेर लावली होती. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सुमारे २६० जण ठार झाले. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचे चित्रिकरणही हमासच्या एका दहशतवाद्याने केले आहे. त्यामध्ये अनेक दहशतवादी कार्यक्रमाबाहेर ठेवण्यात आलेल्या तात्पुरत्या शौचालयांवर अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
जयपूरमधील १०० खासगी लॉकरमध्ये ५०० कोटी आणि ५० किलो सोने
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
इस्रायलमधील रीम भागाजवळ नोव्हा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम स्थळाबाहेर तात्पुरती शौचालये बसवण्यात आली होती. गाड्यांमधून घटनास्थळी आलेल्या दहशतवाद्यांनी शौचालयांच्या बंद दारांवर गोळीबार केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ हमासने शुक्रवाही जाहीर केला
एका ग्रामीण भागात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्यू नागरिकांचा सुक्कोत हा सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र हमासच्या दहशतवाद्यांनी या आनंदसोहळा दुःखात बुडवला. किमान २६० जण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. तर, शेकडो जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. शेकडो नागरिक या हल्ल्यानंतर शेतांतून सैरावैरा पळत असल्याचे व्हिडीओंमध्ये दिसत आहे. तर बंदुकीच्या गोळ्यांचे आवाजही मागे ऐकू येत आहेत. महोत्सवाचे आयोजक आणि सुरक्षा दले या हरवलेल्या नागरिकांचा अद्याप शोध घेत आहेत.