‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, या सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच इतिहास रचला आहे.
मराठीतील आघाडीचा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा नव्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सिनेमाचे पोस्टर न्युयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या सिनेमाने इतिहास रचला आहे.
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत असून येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीच्या वतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिलं आहे, “आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला.”
View this post on Instagram
दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाची घोषणा करताना एक व्हिडिओ शेअर केला होता. “उजळला तेजाने, पुरंदराचा माथा..सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा..शत्रू होई परास्त, असा ज्याचा गमिनी कावा..शिवरायांचा अवतार जणू..अवतरला ‘शिवरायांचा छावा’,” असे त्यांनी लिहिले होते. ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कयेथील प्रतिष्ठित असणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे.
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवेल.
हे ही वाचा:
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
इस्लामिक दहशतवादाचा फ्रान्सवर विपरित परिणाम
ऑपरेशन अजय: २३५ प्रवाशांना घेऊन दुसरे विमान भारतात दाखल
एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या इतर सिनेमाप्रमाणे हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.