हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरतेच्या कहाण्या दिवसेंदिवस उघड होत आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी काही तान्हुल्या बाळांची हत्या करून त्यांना जाळल्याचे नृशंस कृत्य केले आहे. या तान्हुल्यांची छायाचित्रेच इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी इस्रायलच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव एँथनी ब्लिंकेन यांना दाखवली.
यातील काही छायाचित्रांमध्ये तान्हुल्या बाळांचे काळे पडलेले आणि जळालेले शव दिसत आहेत. या मुलांची हत्या हमासच्या दहशतवाद्यांनी केली, असे इस्रायलतर्फे सांगण्यात आले. ‘पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकेन यांना दाखवलेली काही निवड छायाचित्रे… हमासच्या राक्षसांनी हत्या केलेल्या आणि त्यांना जाळलेल्या तान्हुल्यांची ही भयानक छायाचित्रे आहेत. हमास हे क्रूर आहेत. हमास हे आयसिस आहेत,’ असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्याद्वारे सांगण्यात आले.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या सुरक्षा दलाला सुमारे ४० तान्हुल्यांची शव सापडली असून, त्यापैकी अनेकांचे शीर धडावेगळे करण्यात आले आहे.
निकोल झेडेक या पत्रकारानेही याबाबत माहिती दिली. ‘हे कृत्य म्हणजे आतापर्यंत इस्रायलमध्ये आम्ही पाहिलेले हिंसाचाराचे टोक आहे. अशाप्रकारचे नृशंस कृत्य कधीच झाले नव्हते,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ही छायाचित्रे जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही हा हल्ला म्हणजे कूरता असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद्यांनी मुलांची कत्तल केलेली छायाचित्रे पाहून मला दुजारो द्यावा लागेल, असे मला यत्किंचितही वाटले नव्हते,’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी दिली. मात्र बायडेन किंवा अन्य अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची छायाचित्रे स्वतंत्रपणे पाहिलेली नाहीत आणि अशा वृत्ताला दुजोराही दिलेला नाही, असे नंतर व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया ही प्रसारमाध्यमे आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्याचे व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा:
सुप्रियाताईंना १०० कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल!
पंतप्रधानांनी पिठोरागडमध्ये केले कैलास दर्शन, भक्तांसाठी नवा मार्ग
खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय
भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!
व्हाइट हाऊसने अशा प्रकारचे निवेदन दिल्यानंतर इस्रायली सरकारतर्फे हमासने कत्तल केलेल्या लहान मुलांची छायाचित्रे जाहीर करण्यात आली. ही छायाचित्रे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकेन यांना दाखवण्यात आल्याचे इस्रायल सरकारतर्फे सांगण्यात आले.