25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषशहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली

Google News Follow

Related

सिरिअल नं २०/1; घटनेची तारीख : २७:२:१९३१; गुन्हा : ३०७ (आयपीसी); आरोपींची नावे : चंद्रशेखर आझाद, २. अज्ञात; परिणाम : ?
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील कलोनलगंज पोलिस ठाण्याच्या एका कोनाड्यात पडलेल्या रजिस्टर क्रमांक आठमध्ये ही ऐतिहासिक नोंद आढळली आहे. या रजिस्टरमधील ‘ग्रामीण गुन्ह्यांची नोंद’ या पानांवरची ही नोंद वाचून येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने या नोंदीचे ऐतिहासिक महत्त्व ओळखले. आता हे ऐतिहासिक पान फ्रेममध्ये बंदिस्त करण्यात आले असून अभिमानाने पोलिस ठाण्याच्या भिंतीवर विराजमान झाले आहे.

 

‘आझाद यांच्या विरुद्धचा हा एफआयआर उर्दू भाषेत आहे. तो ज्या नोंदवहीत आहे, त्या आठ क्रमांकाच्या या नोंदवहीला अजिबात धक्का न लावता आम्ही त्या पानाचे स्पष्ट छायाचित्र काढून फ्रेम केले आहे आणि पोलिस ठाण्यात लावले आहे,’ असे कोलोनलगंजचे पोलिस अधिकारी ब्रिजेश सिंह यांनी सांगतिले.

हे ही वाचा:

इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या

२७ फेब्रुवारी, १९३१ रोजी तत्कालीन अलाहाबाद (आताचे प्रयागराज)येथील आल्फ्रेड पार्क (आताचे चंद्रशेखर आझाद उद्यान) येथे पोलिसांची चकमक झाल्यानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन साँडर्स यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद याच पार्कमध्ये त्यांचे मित्र सुखदेव राज यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याची खबर तेव्हाचे स्थानिक गुप्तचर प्रमुख जेआरएच नॉट बोवर यांना मिळाली होती.

 

 

त्यांनी पोलिसांना याबाबत सतर्क केल्यानंतर पोलिसांनी येथे गोळीबार केला. आझाद यांनी त्यांचे मित्र सुखदेव यांना सुरक्षित पळून जाता यावे, यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. चंद्रशेखर आझाद यांना अनेक गोळ्या लागल्या. मात्र त्यांच्या गळ्यांनी नॉट बॉवर आणि पोलिस पथकाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुखाचा वेध घेतला. अखेरीस आझाद यांच्याकडे केवळ एकच गोळी शिल्लक राहिली होती. तेव्हा ब्रिटिशांनी आपल्याला जिवंत पकडू नये, यासाठी त्यांनी स्वतःवरच गोळी झाडली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा