25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमलेशियातील खोखो कसोटी मालिकेसाठी महाराष्ट्रातील चौघांची निवड

मलेशियातील खोखो कसोटी मालिकेसाठी महाराष्ट्रातील चौघांची निवड

डॉ. चंद्रजीत जाधव स्पर्धा तांत्रिक संचालक

Google News Follow

Related

खो-खो आता भारतातच नव्हे तर परदेशांत सुध्दा जोमाने खेळला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये वेगवेगळ्या वयोगटांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मलेशियात १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या कुमार-मुली गट खो-खो कसोटी मालिकेसाठी महाराष्ट्रातील चार खोखो खेळाडूंची निवड झाली आहे.

 

भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी भारतीय संघ जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राच्या किरण वसावे (धाराशिव) व निखिल सोडिये (मुंबई उपनगर) यांची मुलांच्या गटात तर संपदा मोरे (धाराशिव) व प्रीती काळे (सोलापूर) (पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोलीची) यांची मुलींच्या गटात निवड झाली आहे.

 

मुलांच्या प्रशिक्षकपदी संभाजीनगरच्या विकास सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकास हे एनआयएस प्रशिक्षक असून राष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. संभाजीनगर जिल्हा खोखो संघटनेचे ते सचिव आहेत. तसेच भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव (धाराशिव) यांची स्पर्धेच्या तांत्रिक संचालक पदी निवड झाली आहे.

 

महाराष्ट्रातील खेळाडू व पदाधिकारी यांच्या झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस गोविंद शर्मा, खजिनदार अरुण देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

 

हे ही वाचा:

‘हमासला इराणकडून निधीपुरवठा’

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रिपदाची शक्यता!

सेव्ह गाझा वाले सक्रीय झाले…

‘भारताला दहशतवादाची सखोल समज’

खेळाडूंची थोडक्यात कामगिरी:

निखिल सोडिये : भारतीय खोखो महासंघाच्या किशोर व कुमारी राष्ट्रीय स्पर्धेत व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत त्याने भाग घेतला होता तसेच त्याने पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. नरेंद्र कुंदर त्याचे प्रशिक्षक आहेत.

 

किरण वसावे : भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किशोर गटात दोन वेळेस व कुमार गटात चार वेळेस प्रतिनिधित्व करीत सुवर्ण अशी कामगिरी केली. या स्पर्धेतील वीर अभिमन्यू पुरस्काराचाही तो मानकरी ठरला सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघातून खेलो इंडिया स्पर्धेत दोन वेळेस भाग घेतला होता. प्रवीण बागल त्याचे प्रशिक्षक आहेत.

 

संपदा मोरे : दोन शालेय राष्ट्रीय स्पर्धा, भारतीय खो-खो महासंघाच्या संघाच्या दोन मुलींच्या एक महिला गटाची राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा, नॅशनल गेम व खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग. सर्व स्पर्धेत सुवर्ण. प्रवीण बागल तिचे प्रशिक्षक आहेत.

 

प्रीती काळे: शालेय व भारतीय खो-खो महासंघाच्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेत नऊ वेळा महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले. भारतीय खोखो महासंघाच्या कुमार राष्ट्रीय स्पर्धेतील जानकी पुरस्काराची मानकरी. खेलो इंडिया स्पर्धेतही सहभाग. भारतीय संघातून खेळणारी सोलापूर जिल्ह्याची पहिली मुलगी. संतोष पाटील तिचे प्रशिक्षक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा