इस्रायलवर हमास या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातून इस्रायलला समर्थन मिळते आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे राददूत नाओर गिलॉन यांनी भारताचे आभार मानले आहेत. ‘भारताला दहशतवादाची सखोल समज आहे. त्याचे जगावर काय परिणाम होतात, याचीदेखील जाण आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
‘भारत हा प्रभावशाही देश आहे आणि त्याला दहशतवादासमोरची आव्हाने अवगत असल्याने इस्रायलला भारताच्या मजबूत पाठिंब्याची आवश्यकता आहे,’ असे नाओर गिलॉन यांनी म्हटले आहे. ‘हमास दहशतवाद्यांनी केलेला हल्ला संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. इस्रायल या आव्हानांचा मुकाबला स्वतःच्या बळावर करेल आणि या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देईल,’ असेही प्रतिपादन त्यांनी केले.
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारपासून केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ७००हून इस्रायली नागरिक आणि सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील ३०० नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनच्या अधिकाऱ्यांनी केला.
हे ही वाचा:
श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार
भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय
तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!
सोमवारी सुनावणी, अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करा!
‘हल्ल्यामागे इराणचा हात’
इस्रायलवरील हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा आरोपही गिलॉन यांनी केला. तसेच, इराणमधून हमासच्या दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘या हल्ल्यामागे इराणचा हात आहे, हे स्पष्टच झाले आहे. तसेच, इराणकडून दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षणही दिले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला. आता कोणत्याही मध्यस्थीची वेळ टळून गेली आहे. आता दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची वेळ आहे, असेही ते म्हणाले. ‘आम्हाला भारतीय मित्रांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला.