25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाअपघातातील मृताचे शव कालव्यात टाकले; बिहारमधील तीन पोलिस निलंबित

अपघातातील मृताचे शव कालव्यात टाकले; बिहारमधील तीन पोलिस निलंबित

Google News Follow

Related

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीचे शव कालव्यात टाकल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी तिघा पोलिसांना निलंबित केले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांच्या या घृणास्पद कृत्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली होती.

मुझफ्फरपूर जिल्ह्यात फाकुली भागाती धोढ कालव्यावरील पुलावर ही घटना घडली. या पुलावरून हे तिघे पोलिस अपघातातील मृताचे अवशेष कालव्यात टाकत असल्याचे आढळून आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.

‘या व्हिडीओची सत्यता तपासण्यात आल्यानंतर तो खरा असल्याचे आढळून आले आहे. ही दुर्दैवी घटना आहे. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आहे,’ असे मुझफ्फरपूरमधील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत सहभागी असलेल्या चालक कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे, तर दोन होम गार्ड जवानांचे कंत्राट रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या व्यक्तीचे अवशेष पुन्हा मिळवून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही, असे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

ही घटना घडली, तेव्हा जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. या व्हिडीओत दोघे पोलिस अधिकारी रक्ताळलेले शव ओढत नेत असल्याचे दिसून येत आहे. तर, तिसरा पोलिस त्यांना मदत करत आहे. मृतदेह कालव्यात टाकण्यासाठी ते तिघेही तो काठीने ढकलत असल्याचे आढळून आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा