24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषअबब! खात्यात जमा झाले ७५३ कोटी!

अबब! खात्यात जमा झाले ७५३ कोटी!

मेडिकल दुकानात काम करणाऱ्याचे नशीब फळफळले

Google News Follow

Related

चेन्नईतील मेडिकलवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या खात्यात अचानकपणे ७५३ कोटी रुपये जमा झाल्याने एकदमच त्याच नशीब फळफळलं आहे.जमा झालेली रक्कम त्याची जरी नसली तरी त्याला थोडा काळ का होईना त्याला श्रीमंत झाल्याचे जाणवले.मात्र, शेवटी त्याच्या खात्या मध्ये जमा झालेली रक्कम ही आपली नसून बँकेच्या चुकीने आपल्या खात्यात आल्याचे समजताच त्याला ती परत करावी लागली.

सध्याचे युग हे ऑनलाईनचे आहे.ऑनलाईनच्या जगात थोड्याशा चुकीमुळे पैसे देणारा आणि घेणाऱ्याला सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो.मात्र ह्याच ऑनलाईनमुळे एकाला थोडा काळ का होईना श्रीमंत केलं आणि क्षणात गरीबही.अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली.मेडिकलवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये ७५३ कोटी रुपये जमा झाले.मोहम्मद इद्रिस नामक व्यक्तीच्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने एकच खळबळ उडाली.थोडा वेळ त्याला स्वतःवर देखील विश्वास बसला नाही.घडले असे की,मोहम्मद इद्रिस हा चेन्नईतील तेनामापेठ येथील मेडिकलवर काम करतो. तो मूळचा करणकोविल येथील रहिवाशी आहे.७ ऑक्टोबर रोजी त्याच्या एका मित्राने दोन हजारांची मदत मागितली.

हे ही वाचा:

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

इस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप

प्रथमच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक

इद्रिसने मित्राच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले.कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून त्याने मित्राला ही मदत केली.त्यानंतर सर्वाना एक सवय असते ती म्हणजे खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे ते पाहण्याची. इद्रिसने सुद्धा हेच केले आपल्या खात्यात किती रक्कम उरली आहे हे तपासण्यासाठी त्याने बँक बॅलेन्स तपासले.आपल्या खात्यात ७५३ कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसले, तेव्हा त्याला एकच धक्का बसला.त्यानंतर शेवटी त्याला दुसराच संशय आला.चुकून आपल्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे त्याला आढळून आले. नाहक कोणत्याच वादात अडकण्यापेक्षा त्याने अगोदर ही माहिती त्याच्या बँक शाखेला कळवली. या प्रकाराने बँक अधिकारी पण चक्रावले. तांत्रिक चुकीमुळे त्याच्या खात्यात भलीमोठी रक्कम आल्याचे सांगत बँकेने इद्रिसचेच खाते गोठवले.मात्र, या घटनेने त्याची एकच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

तामिळनाडूमध्ये तांत्रिक चुकांमुळे काही जण कोट्याधीश झाले आहेत. अशा चुका वारंवार होत असल्याचे समोर आले आहे. अशी घटना नुकतीच घडली होती. चेन्नई येथील कॅब चालक राजकुमार याला तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने असेच करोडपती केले होते. त्याच्या खात्यात थेट ९००० कोटी रुपये जमा झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा