27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषभारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज!

भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज!

भारतीय वायुसेना (IAF) प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडून नवीन ध्वजाचे अनावरण

Google News Follow

Related

आज भारतीय हवाई दलाचा ९१ वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने आज वायू दलाला नवा ध्वज मिळाला आहे. भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवीन झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. ७२ वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे.आज वायुसेना दिनानिमित्त प्रयागराजमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आलं आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवीन ध्वजाचं अनावरण केलं. नवीन ध्वजावर उजव्या कोपर्‍यात भारतीय वायुसेनेचे चिन्ह असून त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभ आणि त्याखाली “सत्यमेव जयते” असे शब्द आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

एअर इंडियाकडून इस्रायलची विमानसेवा रद्द!

कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

भारतीय वायुसेनेची १९३२ मध्ये स्थापना करण्यात आली होती.सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलाचे प्रमुख होते.त्या वेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते.इंग्रजांच्या शासन काळात भारतीय वायुसेनेला रॉयल इंडियन एअरफोर्स नावाने ओळखले जात होते.दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा रॉयल हा शब्द हटवण्यात आला.त्यानंतर भारतीय वायुसेना नावाने ओळखले जाऊ लागले.त्यामुळे ८ ऑक्टोबरला वायुसेना दिवस साजरा करण्यात येतो.भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे.उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथे असलेले हिंडन हवाई दल हे आशियातील सर्वात मोठे स्थानक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा