27 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरविशेषप्रथमच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक

प्रथमच आशियाई स्पर्धेत उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक

पावसामुळे सामना रद्द; आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या आधारे भारत विजयी

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरूचं असून पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणीस्तान असा रंगाणारा हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी टी- २० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे असा निर्णय देण्यात आला.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच आशियाई स्पर्धेत सहभागी झाला होता. पहिल्यांदा सहभागी झालेल्या या संघाने आपल्या नावे सुवर्ण पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते, तर २०१४ मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती. ३० धावांच्या आतच अफगाणिस्तानचे तीन फलंदाज तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते. त्यानंतर काहीशा सावरलेल्या अफगानिस्तानच्या संघाने पाऊस सुरु होईपर्यंत १८.२ षटकात ५ विकेट्स गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तामध्ये चुरशीचा सामना होण्याची शक्यता होती.

हे ही वाचा:

‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?

यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही. पाऊस थांबण्याची चिन्ह नसल्याने सामना कॉल ऑफ करण्यात आला. भारताची आंतरराष्ट्रीय रँकिंग अफगाणिस्तानपेक्षा चांगली आहे. त्यामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले. या घोषणेनंतर भारताने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा