23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषभारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

चिराग शेट्टी-स्वस्तिक साईराजची जबरदस्त कामगिरी

Google News Follow

Related

भारताची बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी एशियन गेम्स २०२३ मध्ये अव्वल कामगिरी केली आहे. या जोडीने बॅडमिंटन पुरूष दुहेरीचे सुवर्ण पदक पटकावले आहे. यंदा आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत अनेक नवे विक्रम रचले आहेत. भारताने आता १०० पदकांची संख्या गाठली आहे. विशेष म्हणजे भारताने अशी कामगिरी पहिल्यांदा केली आहे.

भारतीय खेळाडू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांच्या जोडीने अंतिम सामन्यात कोरियाच्या जोडीचा २१ – १८, २१ – १६ असा पराभव केला. विशेष म्हणजे भारताचे एशियन गेम्सचे बॅडमिंटनमधील हे पहिले सुवर्ण पदक आहे. या पदकासोबतच भारताची सुवर्ण पदकांची संख्या आता २६ वर पोहचली आहे. भारताने २६ सुवर्ण पदकांसह ३५ कांस्य आणि ४० रौप्य पदके जिंकत यंदाच्या एशियन गेम्समध्ये १०१ पदकांचा टप्पा गाठला आहे. अजूनही काही खेळ बाकी असून त्यातील अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना पदके निश्चित आहेत. ही भारताची एशियन गेम्सच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोरियाच्या चोई आणि किम वोनहो यांच्याविरूद्धच्या फायलन सामन्यात पहिल्या गेममध्ये पिछाडीवर होते. त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पहिला गेम २१ – १८ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कोरियाच्या जोडीचे आव्हान २१ – १६ असे परतवून लावत सुवर्ण पदकावर नाव कोरले. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत ही जोडी सध्या तिसऱ्या स्थानावर असून लवकरच नव्या गुणांसह पहिल्या क्रमांकावर जाणार आहे. ते इंडोनेशियाच्या फाजार अलफिअन आणि मोहम्मद रैन अरदिनतो यांचे अव्वल स्थान हिसकावणार आहेत.

हे ही वाचा:

‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक नवे विक्रम रचले आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. भारताने प्रथमच अशी कामगिरी केली आहे. अबकी बार १०० पार असं लक्ष्य घेऊन यंदा भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेमध्ये उतरले होते. हे लक्ष्य भारताने गाठलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा