24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेष‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

Google News Follow

Related

डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद हा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि पुढील दोन वर्षांत त्याचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. माओवादग्रस्त क्षेत्रांतील सुरक्षेचा आढावा घेणारी बैठक शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

 

नरेंद्र मोदी सरकारने माओवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय सैन्याची नियुक्ती करणे, विकासाभिमुख योजना राबवणे तसेच, माओवाद्यांचा गड असणाऱ्या भागांत म्हणजेच ‘व्हॅक्युम एरिया’त सुरक्षा शिबिरे उभारण्यावर भर दिला आहे, अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली.

 

हे भाग बहुतेक घनदाट जंगल असलेल्या भागात आहेत. जेथे सुरक्षा किंवा प्रशासकीय यंत्रणा अद्याप प्रवेश करू शकलेली नाही. रणनीतीचा एक भाग म्हणून आपली नक्षलविरोधी सैन्य आता अशा भागात खोलवर जात आहेत. डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांना मागे ढकलत आहेत आणि प्रशासकीय आणि विकासाला चालना देण्यासाठी तेथे सुरक्षा छावण्या उभारत आहेत, अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली.

 

 

सन २०१९ पासून अशी क्षेत्रे कमी होत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या १९५ छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि आणखी ४४ छावण्या लवकरच उभारल्या जातील. मात्र डाव्यांच्या तावडीतून मुक्त झालेल्या भागावर सतत पाळत ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तिथे माओवाद्यांनी पुन्हा डोके वर काढता कामा नये, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला माओवादग्रस्त जिल्ह्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक उपस्थित होते. तसेच, काही केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारचे सचिव; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल; गृह सचिव ए. के. भल्ला आणि सीएपीएफचे संचालकही उपस्थित होते.

हे ही वाचा:

आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

कॅनडामधील विमान अपघातात दोन भारतीय ट्रेनी पायलट्सचा मृत्यू

देशभरातील माओवादग्रस्त भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सन २०१०मध्ये हिंसाचारात सुरक्षा दलांचे कर्मचारी, तसेच सामान्य नागरिकांच्या मृत्यूची संख्या २०१०मध्ये सर्वाधिक होती. सन २०२२मध्ये त्यात ९० टक्के घट झाली आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

सन २००४ ते २०१४ या काळात माओवादी हिंसाचाराच्या १७ हजार ६७९ घटना घडल्या व त्यामध्ये सहा हजार ९८४ जणांचा मृत्यू झाला. तर, सन २०१४ ते २०२३ (१५ जूनपर्यंत) या काळात हिंसाचाराच्या सात हजार ६४९ घटना घडल्या व त्यामध्ये २०२० जणांचा मृत्यू ओढवला होता. सन २००५-१४च्या तुलनेत सन २०१४-२०२३ या कालावधीत माओवादग्रस्त भागांतील हिंसाचारात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त, मृत्यूमध्ये ६९ टक्क्यांपेक्षा अधिक, सुरक्षा दलांमधील मृत्यूंमध्ये ७२ टक्के आणि नागरिकांच्या मृत्यूमध्ये ६८ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा