गुरूवार १ एप्रिल रोजी आसाम आणि बंगालमधील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. या मतदानाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. बंगालमध्ये ८१% मतदान झाले तर आसाममध्ये ७७% मतदान पहायला मिळाले. बंगालमधील ३० विधानसभा क्षेत्रात मतदान झाले. मतदाराणी आपला मतदानाचा अधिकार बजावत १९१ उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे. तर आसाम मध्ये ३९ जागांसाठी आसामी मतदारांनी आपला कौल दिला.
या दोन्हीं राज्यातील मिळून ६९ विधांसाभांसाठी २१,२१२ मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. यावेळी कोविड १९ च्या दृष्टीने सर्वती खबरदारी घेण्यात आली असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. तरीही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे भाजपावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करत कायदा सुव्यवस्था हाताबाहेर गेल्याचे म्हटले आहे. तर तृणमूल खासदार डॅरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाला पात्र लिहीत बूथ कॅप्चारिंगचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा
शेतकरी आंदोलक लवकरच संसदेवर मोर्चा आयोजित करणार
सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
ममता की सुवेंदू? जनता करणार फैसला
पश्चिम बंगालच्या निवडणूकांमध्ये आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात नंदीग्राम येथे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध सुवेंदू अधिकारी असा हा सामना असणार आहे. सुवेंदू अधिकारी हे एकेकाळचे ममता यांचे सहकारी होते. पण या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी भारतीय जनति पार्टीत प्रवेश केला. सुवेंदू यांच्या अधिकारी कुटूंबाचा नंदिग्राममध्ये प्रचंड दबदबा आहे. गेल्या निवडणुकांमध्येही सुवेंदू यांना तिथल्या मतदारांनी नावडून दिले होते. पण आता सुवेंदू यांच्यासमोर स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. गुरूवारी सकाळीच बाईक वरून मतदानकेंद्रावर जात सुवेंदू यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
बंगाल आणि आसाम या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे मतदानाच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच या टप्प्यातही रेकाॅर्ड ब्रेक मतदान पाहायला मिळाले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आसाममध्ये ७६% तर बंगालमध्ये ८२% च्या जवळपास मतदान झाले आहे.