30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषएनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?

एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?

नवीन आयुक्तांना प्रभावित करण्यासाठी झाडे उपटून टाकल्याचा आरोप

Google News Follow

Related

डिसेंबर २०२२ मध्ये इंद्रलोक फेज ३ येथे ७१,००० चौरस फूट हिरव्यागार जमिनीचा ताबा मियावाकी जंगलाच्या विकासासाठी तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला होता. ही जमीन विविध नामांकित कॉर्पोरेट्सच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी वापरून विकसित करायची होती. या प्रकल्पाला गो शून्य (अंमलबजावणी पार्टनर) ,
युनायटेड वे (एनजीओ पार्टनर), क्रिसिल (सीएसआर पार्टनर), फि फिनसर्व्ह (सीएसआर पार्टनर), जेपी मॉर्गन (सीएसआर पार्टनर), इंट्रासॉफ्ट (सीएसआर पार्टनर) आणि मेकिंग द डिफरन्स चॅरिटेबल ट्रस्ट (लोकल एनजीओ पार्टनर) ब्युरो व्हेरिटास फ्रान्स आधारित कंपनी ह्यांचा सारख्या विविध भागधारकांचा पाठिंबा लाभला.

 

फेब्रुवारीअखेर पहिल्या टप्प्यात १०५०० झाडे लावण्यात आली, जिथे त्या झाडांची अभूतपूर्व वाढ झाली आहे.
२०२३ च्या पावसापूर्वी जून महिन्यात दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी माय एमबीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आणि जमीन भागधारकांना दिली. जूनमध्ये ६६०० झाडे लावण्यात आली होती तर ऑगस्टमध्ये आणखी ४००० झाडे लावायची होती. १२ ऑगस्ट रोजी सुमारे २०० NSS स्वयंसेवकांनी मेरी मिट्टी मेरा देश ह्या केंद्र सरकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत या साइटवर ५००+ झाडे लावली. ह्याच काळात दिलीप ढोले यांची बदली झाली आणि IAS संजय काटकर यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.

 

हे ही वाचा:

राऊत साहेब, आधी लोकांच्यातून निवडून या… मग म्हणा ऐरे गेरे!

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी

एक्सप्रेस थांबली नाही, तरूणांनी टाकल्या उड्या एकाचा मृत्यू

 

गार्डन डीएमसी कल्पिता पिंपळे यांनी मात्न नवीन आयुक्तांना प्रभावित करण्यासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे उपटून टाकल्याचा आरोप एनएसएस स्वयंसेवकांच्या वतीने करण्यात आला आहे. सीएसआर निधी वापरून जमीन तयार करण्यात आली होती, एमबीएमसीने एक पैसाही दिला नव्हता, परंतु जबरदस्तीने सर्व काही जप्त केले गेले आणि तिने हा उपक्रम एमबीएमसीने घडवूं आणला असें दर्शविणारा बोर्ड पिंपळे यांनी लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

 

प्रकल्प सुरू झाला तेव्हा जमिनीची दुरवस्था झाली होती. एनएसएसच्या स्वयंसेवकांनी कॉर्पोरेट्स आणि एनजीओसह या जमिनीवर स्वच्छता मोहीम राबवून ही जमीन सुपीक बनवली. त्या जमिनीवर आणखी ४००० झाडे लावण्यत येणार होती.
ज्या NSS स्वयंसेवकांनी प्रेमाने वृक्षारोपण केले होते ती झाडे मात्र उपटून टाकण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा