लुलू समूहाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच भारत जगामध्ये एक उगवती शक्ती म्हणून स्थान निर्माण करू शकला आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळेच भारताला जगातील सर्वांत मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक मानले जात आहे. सुमारे ३५.४ लाख भारतीय यूएईच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत,’असे उद्गार लुलू समूहाचे अध्यक्ष आणि संचालक युसूफ अली यांनी काढले आहेत.
अबूधाबी चेंबरने भारत आणि संयुक्त अरब अमिरातच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलावली होती. यावेळी युसुफ अली यांनी ‘यूएई आणि भारताचे लक्ष्य शांती, स्थिरता आणि आर्थिक प्रगती हे आहे, असे प्रतिपादन केले. राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या नेतृत्वाखाली यूएई वेगवान आणि जगभरातील प्रगत देशांमध्ये गणले जाते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वैश्विक शक्तीच्या रूपात घोडदौड करत आहे. भारताला आता जगभरातील सर्वांत मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक मानले जात आहे,’ असे गौरवोद्गार काढले.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
यूएईत राहणारे ३५.४ लाखांहून भारतीय यूएईच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. यूएईच्या विकासात भारतीयांचे मोठे योगदान आहे. भारतीय येथेही मोठ्या सन्मानाने राहतात. भारत आणि यूएई एकमेकांच्या सहकार्याने करून प्रगती करत आहेत, मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उदारमतवादी धोरणांना प्रोत्साहन मिळाले आहे, असेही युसूफ यांनी यावेळी सांगितले. तर, भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय व्यापार १०० अरब अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी नमूद केले.