24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेष‘न्यूजक्लिक’ने अमेरिकी उद्योगपतीकडून स्वीकारले २८.२९ कोटी रुपये!

‘न्यूजक्लिक’ने अमेरिकी उद्योगपतीकडून स्वीकारले २८.२९ कोटी रुपये!

ईडीने पहिल्यांदा ‘न्यूजक्लिक’ या वेबसाइटविरोधात सन २०२१मध्ये मनी लाँड्रिंगप्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

Google News Follow

Related

‘न्यूजक्लिक’ या वेब पोर्टलला सन २०१८ ते २०२१ दरम्यान नेविल रॉय सिंघम या अमेरिकास्थित उद्योजकाशी संबंधित विविध संस्थांकडून २९ कोटी २९ लाख रुपये मिळाल्याचे आढळून आले आहे. या अमेरिकी उद्योजकावर चीनधार्जिणा प्रचार केल्याचा आरोप आहे. तसेच, सिंघम यांनी सन २०१७मध्ये विकलेल्या कंपनीकडूनही काही निधी न्यूजक्लिकला मिळाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

या २८ कोटी २९ लाख रुपयांपैकी २७ कोटी ५१ लाख रुपये अमेरिकास्थित जस्टिस अँड एज्युकेशन फंड या संस्थेकडून मिळाले आहेत. तर, अमेरिकेत नोंदमीकृत असलेल्या जीएसपीएएन एलएलसी कंपनीकडून २६ लाख ९८ रुपये मिळाले आहेत. तर, अमेरिकेतील ट्रायकॉन्टिनेन्टल लिमिटेड कंपनीकडून ४९ लाख ३१ हजार रुपये आणि ब्राझिलस्थित सेंट्रो पॉप्युलर डे मिदास कंपनीकडून दोन लाख तीन हजार रुपये मिळाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.‘न्यूजक्लिक’ची मालक कंपनी असलेल्या पीपीके स्टुडिओ न्यूजक्लिक प्रा. लिमिटेड कंपनीने भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेले गौतम नवलखा यांच्या खात्यात सुमारे २० लाख ५३ हजारांची रक्कम वळती केली आहे, असा दावा या अधिकाऱ्याने केला.

हे ही वाचा:

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

चीनधार्जिणा प्रचार चालवल्याच्या निषेधार्थ ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना दिल्ली पोलिसांनी यूएपीए कायद्याखाली बुधवारी अटक केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने ५ ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या अहवालात न्यूजक्लिकला चीनधार्जिणा प्रचार करण्यासाठी निधी मिळत असल्याचा दावा केला होता. न्यूजक्लिकला अमेरिकी अब्जाधीश सिंघम निधी पुरवत असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले होते.
पुरकायस्थ यांनी ११ जानेवारी, २०१८ रोजी पीपीके स्टुडिओ न्यूजक्लिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती.

तीन महिन्यांनंतर, म्हणजेच एप्रिल २०१८मध्ये न्यूजक्लिकमध्ये डेलावेर येथील वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग्स, एलएलसी या कंपनीने नऊ कोटी ५९ लाखांची गुंतवणूक केली हती. ती कंपनी नंतर बंद पडली. परदेशी गुंतवणूदारांनी त्यांच्या प्रति शेअरचे मूल्य १० रुपयांवरून कृत्रिमरीत्या ११ हजार ५१०पर्यंत वाढवले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तेव्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माकप)च्या अज्ञात सदस्याला ५२ लाख ९ हजार रुपये देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले होते. ईडीने पहिल्यांदा ‘न्यूजक्लिक’ या वेबसाइटविरोधात सन २०२१मध्ये मनी लाँड्रिंगप्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा