30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषसरकारने नांदेडची घटना घेतली गांभीर्याने!

सरकारने नांदेडची घटना घेतली गांभीर्याने!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

Google News Follow

Related

नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नांदेडमधील घटनेच्या ठिकाणी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे पोहोचले आहेत.आज मंत्रालयातील बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली.

नांदेडमधील घटनेवर आज राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.तसेच नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. औषधांसाठी १२ कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

केंद्राने अहवाल मागवला
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला.यानंतर सर्वत्र राज्यभर एकच खळबळ उडाली.त्यानंतर पुढच्या २४ तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.यामध्ये ४ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी देखील या घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

भारती पवार म्हणाल्या की, नांदेड रुग्णालयात रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून त्या बाबतीत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी ऍडमिट झाले होते? ही सर्व माहिती मागविण्यात आली असून नांदेडसह संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे भारती पवार यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा