उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सनातन धर्माचे महत्त्व पटवून देताना, सनातन हा एकमेव धर्म आहे आणि बाकीचे सर्व पंथ आणि उपासनेच्या पद्धती आहेत, असे वक्तव्य केले. तमिळनाडूचे मंत्री आणि एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांच्या “सनातन धर्माचे निर्मूलन करा” या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले आहे.
श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे, बाकीचे सर्व पंथ आणि उपासनेच्या पद्धती आहेत. सनातन हा मानवतेचा धर्म आहे आणि त्यावर आघात झाला, तर सनातन धर्मावर हल्ला होईल. जगभरातील मानवतेसाठी ते संकट असेल.” जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी श्रीमद् भागवताचे सार खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी खुली मानसिकता असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संकुचित दृष्टिकोन आपल्या शिकवणींच्या विशालतेला व्यापून टाकण्यासाठी संघर्ष करतात, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सुंदर दिसण्याच्या महत्त्वाकांक्षेने केला श्रीदेवीचा घात?
कनोइंग स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह, सुनिल सिंह यांची कांस्य पदकाची कमाई
चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी
आशियाई स्पर्धेत नेपाळला नमवत भारताची उपांत्य फेरीत धडक
योगी आदित्यनाथ यांचे विधान तामिळनाडूचे मंत्री आणि एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांच्या “सनातन धर्माचे निर्मूलन करा” या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात बोलत असताना, उदयनिधी यांनी त्यांच्या सनातन धर्मविरोधी वक्तव्याने वाद निर्माण केला. त्यामुळे देशभरात वादाचे मोहोळ उठले. विशेषत: भाजपने त्यांना या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आणि त्याला नुसता विरोध न करता त्यांचे निर्मूलन केले पाहिजे, असे सांगितले होते. उदयनिधी स्टॅलिन यांनी तर सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात असल्याचा दावा केला होता.