राजस्थानमधील भिलवाडा येथे वंदे भारत ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ट्रेन रुळावरून घसरेल अशाप्रकारे ट्रॅकवर दगड आणि लोखंड ठेवण्यात आले होते.
उदयपूर- जयपूर वंदे भारत ट्रेन पास होण्यापूर्वी रुळांवर दगड आणि लोखंड ठेवण्यात आले होते. मात्र, ट्रेनच्या लोको पायलटला हे निदर्शनास आले आणि पायलटने ट्रेन थांबवली आणि मोठा अनर्थ टळला.त्यानंतर रेल्वे ट्रॅक साफ केल्यानंतर ट्रेन पुढे निघाली.या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाला.या व्हिडिओमध्ये लोखंडी रॉड रुळात अडकवून ठेवल्याचेही दिसत आहे.
हे ही वाचा:
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !
जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!
गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?
एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!
जयपूर- उदयपूर वंदे भारत ट्रेन २४ सप्टेंबरला सुरु करण्यात आली होती.राजस्थानची ही तिसरी वंदे भारत ट्रेन असून पंतप्रधान मोदींनी या ट्रेन ला हिरवा कंदील दिला होता.
We have the most cruel animals in our society. Harsh punishments required. pic.twitter.com/tWJgfqm5iB
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 2, 2023
भारतीय रेल्वेकडून याबाबत सध्या काहीही सांगण्यात आलेले नाही.मात्र, याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असे उत्तर पश्चिम रेल्वे आरपीएफने म्हटले आहे.ट्रॅकवर दगड आणि लोखंड ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी भारतीय रेल्वेकडे तक्रार केली.यावर भिलवाड्याचे निरीक्षक याप्रकरणी आवश्यक कारवाई करत असल्याचे अजमेर आरपीएफकडून सांगण्यात आले.