“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत रविवारी १ ऑक्टोबर रोजी देशभरात “एक तारीख एक तास” उपक्रम साजरा करण्यात आला होता.या मोहिमेत देशभरातील अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पैलवान अंकित बैयनपुरीया सोबत स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.भारतीय लष्कर जवान देखील या मोहिमेत सहभागी झाले.
‘ स्वच्छता ही सेवा – एक तारीख, एक घंटा’ या केंद्राच्या उपक्रमांतर्गत गांधी जयंतीनिमित्त शहरातील स्वच्छता मोहिमेत डेहराडूनमधील उत्तराखंड उप-क्षेत्र मुख्यालयातील एकूण १,२०० लष्करी जवानांनी रविवारी सहभाग घेतला.या मोहिमेद्वारे शहरातील ठीक-ठिकाणी भागात जाऊन भारतीय जवानांनी स्वच्छता केली.
डेहराडून येथील जनसंपर्क अधिकारी (संरक्षण) लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव यांनी एका प्रसिद्धीपत्रकात या मोहिमेची माहिती दिली.या पत्रकात त्यांनी नमूद केले होते की,उपक्रमांतर्गत मुख्यालयाने महत्त्वाची क्षेत्रे आणि मोहिमेत समाविष्ट करण्याचे मुद्दे’ ठरवले होते.
हे ही वाचा:
जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!
एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
त्याच्या आधारे, विविध श्रेणीतील लष्करी जवानांनी बिंदल आणि नन यांसारख्या स्थानिक नद्यांमधील कचरा साफ केला जो शहराच्या ड्रेनेज सिस्टमसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी न्यू कॅन्टोन्मेंट रोड आणि नॅशव्हिल रोड, सौर्य स्थळ आणि डेहराडून कॅन्टोन्मेंट अंतर्गत येणारे रहिवासी भाग यासारखे काही राज्य महामार्ग देखील स्वच्छ केल्याचे त्यानी सांगितले.
याशिवाय, त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने स्थानिक रहिवाशांना प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेल्या मोफत डस्टबिनचे वाटप केले.