रविवारी पहाटे केरळच्या कोचीमध्ये पेरियार नदीत कार पडल्याने दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.तर तीन जण जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी चालक गुगल मॅपचा वापर करत होता.मात्र, कार चालकाने पाणी साचलेला रस्ता आहे असे समजून कार वळवली आणि थेट नदीत कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार,एर्नाकुलम येथील गोथुरुथ येथे शनिवारी सकाळी १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.कोल्लमचे मूळचे डॉ. अद्वैथ (२८) आणि कोडुंगल्लूर येथील डॉ. अजमल (२८) अशी मृतांची नावे आहेत. हे तरुण डॉक्टर कोडुंगल्लूर येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. मृतांव्यतिरिक्त, डॉ. खासिक, एमबीबीएसची विद्यार्थिनी थमन्ना आणि एक पुरुष परिचारिका जिस्मोन कारमध्ये होते.मृत डॉ. अद्वैथ यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर राहून हे सर्व जण परतत होते.
हे ही वाचा:
जीएसटी संकलनात १०.२ टक्के वाढ!
स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
मुसळधार पावसामुळे कार चालकाने गुगलचे जीपीएस ट्रॅकिंग चालू करत पुढे प्रवास करत राहिला.गुगल मॅपचा वापर करत ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या भागात पोहचले आणि कार चालकाने पाणी साचलेला रस्ता आहे असे समजून कार वळवली आणि थेट नदीत कार कोसळली.यात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले.स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून तिघांची कार मधून सुटका केली.जखमींना नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.मुसळधार पावसामुळे रस्ता स्पष्ट दिसणे फार अवघड होते.कार चालक गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत होता.पण नकाशामध्ये सांगितल्याप्रमाणे डावीकडे वळण घेण्याऐवजी ते चुकून पुढे गेले आणि नदीत पडल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले.