२६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या साथीदाराची कराचीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.मुफ्ती कैसर फारूक हा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाचा प्रमुख नेता होता तसेच हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता.
पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या मोस्ट वॉन्टेड नेत्यांपैकी एक असलेल्या मुफ्ती कैसर फारूकची कराचीमध्ये “अज्ञात व्यक्तींनी” गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिस सूत्रांनी रविवारी सांगितले.कैसर फारुक हा एलईटीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता.
हे ही वाचा:
अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट
२५ कोटींच्या लुटीचा कट दिल्लीच्या ठगाने एकट्याने नेला तडीस
विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!
आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी समनाबाद परिसरात ३० वर्षीय कैसर फारुख याला लक्ष्यबद्ध करत अज्ञातांनी गोळ्या झाडल्या.पाठीत गोळी लागल्याने फारुखला रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
फारुखच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर फिरत आहे; मात्र, पोलिसांनी फुटेजची पडताळणी केलेली नाही.तसेच या हल्ल्यात एक अल्पवयीन मुलगाही जखमी झाला आहे.अद्याप याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.